कशीश खान यांची अकोला शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती
अकोला : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने कशीश खान यांची अकोला शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी कशीश खान यांना नियुक्तीपत्र देत त्यांचे अभिनंदन केले. या नियुक्तीद्वारे संघटन मजबूत करण्यासाठी तसेच महिला काँग्रेसचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विचारधारेनुसार तसेच अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कार्यरत आहे. त्याच धर्तीवर अकोला शहरात महिला काँग्रेसचे संघटन बळकट करण्यासाठी कशीश खान यांनी पुढाकार घ्यावा, असेही या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.काँग्रेस पक्षाला अधिकाधिक जनाधार मिळवून देण्यासाठी तसेच संघटन विकासासाठी कशीश खान प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वासही प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.