ताज्या घडामोडी

शोभा सोनोने यांच्यावर रानडुकराने त्यांच्यावर जोरदार हल्ला

Akola B7

शोभा सोनोने या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होत्या. त्याचवेळी अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना मदत केली.जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.दरम्यान, या घटनेत एकलव्य आपत्कालीन पथकाचे पांडुरंग तायडे यांनी महत्त्वाची मदत करत जखमी महिलेला वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकले.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगलालगतच्या भागात रानडुकरांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.