ताज्या घडामोडी
मुंब्रामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांवरही फायरिंग
Akola B7
मुंब्रामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांवरही फायरिंग
ठाण्यातील मुंब्रा-कौसा परिसरात शनिवारी पहाटे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कन्स्ट्रक्शन व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (४५) यांच्या घराबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींकडून पोलिसांवरही २ राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत २ जण जखमी झाले आहेत.