ताज्या घडामोडी

आज सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून आणलेल्या 293 च्या प्रस्तावावर आमदार रणधीर सावरकर यांनी विरोधी पक्षाला चोख उत्तर देत महायुती शासनाची बाजू भक्कमपणे सभागृहामध्ये मांडली …….

Akola B7

आज सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून आणलेल्या 293 च्या प्रस्तावावर आमदार रणधीर सावरकर यांनी विरोधी पक्षाला चोख उत्तर देत महायुती शासनाची बाजू भक्कमपणे सभागृहामध्ये मांडली …….

महाराष्ट्र..राज्याचा विकास करताना विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाने केलेल्या विकास लक्षात घेणे गरजेचे आहे इथपासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून आपल्या खात्याचे मंत्री, अर्थमंत्री यांना कसा योग्य सल्ला द्यावा याबाबत सुद्धा सभागृहाचे लक्ष वेधले , राज्यातील खाजगी महामंडळापैकी महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळ अकोला हे एकमेव नफ्यातील महामंडळ असून सुद्धा तेथील कर्मचाऱ्यांच्या मागणी प्रमाणे वेतन आयोगाची थकबाकी लागू करून जे पैसे वितरित करावयाचे आहेत, जे पैसे शासनाला अदा करावयाचे नाहीत फक्त शासनाला परवानगी देणे आहे अशी परवानगी शुद्धा शासनकशी देत नाही याबाबत सुद्धा त्यांनी सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण विवेचन केले ,विरोधी पक्षाकडून टोमणे मारण्याच्या पद्धतीचे किंवा अभ्यासाच्या अभावच्या पद्धतीने जी टीका केली जाते त्याबाबत सुद्धा त्यांनी सत्ताधारी पक्षाकडून केलेल्या विकासाबद्दल मनाची प्रगल्भता दाखवून राज्य शासनाच्या विकासावर विरोधी पक्षाकडुन भाष्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली महाराष्ट्र शासनाने जीएसटी सारखे कराचे माध्यमातून देशामध्ये सर्वोच्च टॅक्स वसुली केली आहे हे विसरून चालणार नाही अर्थसंकल्प सादर करताना तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो अशा विरोधी पक्षाच्या टीकेवर त्यांनी लक्षवेधत त्यांना सांगितले की यापूर्वी राज्यात माननीय अजितदादा पवार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार हे अर्थमंत्री असताना महाराष्ट्र शासनाचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले होते, याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले राज्यातील महानगरपालिकांमध्ये पिण्याचे पाणी , भूमिगत गटार योजना राबविण्याकरिता अमृत योजने करिता महानगरपालिका चा 30% चा स्वहिस्सा महानगरपालिकांना जो महानगरपालिका शक्य नाही त्याकरिता महानगरपालिकांना बिनव्याजी दीर्घकालीन बीनव्याजी मुदत कर्ज व रक्कम देण्याचा निर्णय माननीय देवेंद्र फडणीस यांनी घेतलेला आहे त्यामुळे अशा महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे महानगरपालिकांना नागरिकांसाठी निर्माण करावयाच्या मूलभूत सुविधा सहज निर्माण करण्यात येतील आज सभागृहामध्ये रणधीर सावरकर यांनी सत्तारूढ पक्षावर प्रस्तावाला उत्तर देतात ना चौफेर विषय हाताळत आपल्या अभ्यासपूर्ण व्यासंगाची प्रचिती देत महायुती शासनाने महाराष्ट्राच्या विकासामध्ये दिलेले आणि देत असलेले योगदान विसरल्या जाणार नाही अशी स्पष्टुक्ती आपल्या मुद्देसूद भाषणातून सभागृहात केली

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.