गुजरात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संदीप सागळे यांचा सोनार महासंघातर्फे सत्कारविलासराव अनासाने : अकोल्याचे सुपुत्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान
Akola B7
गुजरात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संदीप सागळे यांचा सोनार महासंघातर्फे सत्कारविलासराव अनासाने : अकोल्याचे सुपुत्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान
अकोला, दि. ४ : भारतीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी संदीप जनार्दन सागळे यांची गुजरात राज्याचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अत्यंत शिस्तप्रिय असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संदीप सागळे यांचा संपूर्ण देशात नावलौकिक असून ते अकोल्याचे सुपुत्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन सोनार महासंघाचे माजी अध्यक्ष विलासराव अनासाने यांनी केले.श्री. सागळे हे अकोल्याचे सुपुत्र आहेत. श्री. सागळे हे गुजरात कॅडरचे २००७ चे आयएएस अधिकारी असून, त्यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. गुजरातमध्ये मतदार यादीची विशेष सघन सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, निवडणूक आयोगाने नवीन मुख्य निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने २००७ च्या बॅचचे स्वच्छ प्रतिमेचे आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सागळे यांनी यापूर्वी अहमदाबादचे जिल्हाधिकारी, तसेच बनासकांठा आणि भरूच सारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. सागळे यांनी काही काळ गांधीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. १६ नोव्हेंबर १९७३ रोजी जन्मलेले संदीप सागळे हे मूळ महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने संदीप सागळे यांच्यावर दिलेली मोठी जबाबदारी यशस्वीपणे सार्थकी लावतील असा विश्वास आम्हाला असल्याचे सोनार महासंघाचे माजी अध्यक्ष विलासराव अनासाने यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अहमदाबाद येथे श्री सागळे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सोनार महासंघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनार्दन सागळे, विशाल माथने (बडोदा) यांची उपस्थिती होती.