मरणानंतरही यातना संपेनात; मोबाइलच्या टॉर्चमध्ये अंत्यसंस्कारस्मशानभूमीत मोठी गैरसोय कल्याणमधील चक्कीनाका
Akola B7
मरणानंतरही यातना संपेनात; मोबाइलच्या टॉर्चमध्ये अंत्यसंस्कारस्मशानभूमीत मोठी गैरसोय कल्याणमधील चक्कीनाका
कल्याण : मरणानंतरही यातना सुरूच असल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये उजेडात आली. गैरसोयीमुळे पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात स्मशानभूमीत प्रकाशाअभावी मोबाइल टॉर्चमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर शुक्रवारी ओढवली. स्मशानभूमीतलाकडावरीलदहनासाठी दोन रॅक आहेत. परंतु, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक तेथे नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन आलेल्यांनाच वखारीतून लाकडे रॅकमध्ये ठेवावी लागतात. ज्या ठिकाणी रॅक आहेत त्या ठिकाणी दिवे नाहीत. त्याच्याबाहेर विजेचे दोन खांब आहेत. त्यापैकी एक दिवा सतत बंद-चालू होतो. परिणामी, ज्या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात, तेथे पुरेसा प्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे लोकसेवा नगरमधून अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांनी मोबाइल टॉर्चचा आधार घेत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.दफनभूमीचीही दुरवस्था : बाजूलाच लहान मुलांसाठी दफनभूमी आहे. परंतु, देखभाल-दुरुस्तीअभावी त्या ठिकाणी झाडेझुडपे उगवली आहेत. त्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आणि अन्य कचरा असल्याने ही जागा दफन करण्यायोग्य राहिली आहे का, अशी शंका उपस्थित होते.मित्राच्या जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले. पार्थिव स्मशानभूमीत आणले तेव्हा पुरेसा प्रकाश नव्हता. त्यामुळे मोबाइल टॉर्चचा आधार घ्यावा लागला. येथे दिव्यांची व्यवस्था करता येत नसली तरी बाजूकडील भागातून पुरेसा प्रकाश आला तर अंधार राहणार नाही. मनोज वाघमारे, रहिवासी, कल्याण (पूर्व)… म्हणून येथे यावे लागतेपूर्वेसाठी विठ्ठलवाडी स्मशानभूमी आहे. परंतु, ती चक्कीनाका परिसरापासून लांब आहे. त्यात या मार्गावर सकाळ-संध्याकाळ वाहनांची वर्दळ असते. दुसरा पर्याय पश्चिमेकडील बैलबाजार स्मशानभूमी आहे.
२ त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूककोंडीतून मार्ग काढत जावे लागते. अंत्यसंस्कारासाठी जवळच्या चक्कीनाका येथील स्मशानभूमीचा आधार त्या परिसरातील नागरिकांकडून घेतला जातो.
📣 *अतिशय महत्त्वाचे*
*डॉ. गोंधणे 24 फेब्रुवारी रोजी अकोला मध्ये*
🩺 *महाराष्ट्रातील प्रख्यात त्वचा व सौंदर्य विकार तज्ज्ञ डॉ. गोंधणे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवार आपल्या अकोला येथे येत असतात. सर्व संबंधित रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा..*
🕘 *सकाळी 10:00 ते संध्या 6:00 पर्यंत*
📞 *8446781238*
💯 *हो हे शक्य आहे*…!
🩺 *आमच्या अभिनव उपचारप्रणालीमुळे….*
* *चेहऱ्यावरील पिंपल्स ( मुरूम) व काळे डाग(वांग) पहिल्या दिवसांपासून कमी होतात.*
* *भयंकर वेदनादायक खाज फक्त २ मिनिटांत कमी होते.*
* *नागीणसारख्या भयंकर आजाराची आग व वेदना फक्त २ मिनिटांतच कमी होते.*
* *सोरायसीसची खाज २ दिवसांत कमी होऊन चट्टे ३ दिवसांत कमी होतात.*
* *तळपायाच्या, तळहाताच्या भेगांची खाज २ मिनिटांतच कमी होऊन पहिल्या दिवसांपासून भेगा कमी होतात.*
* *केसगळती व केसांची समस्या पहिल्या पासुन कमी होते*
🧑🏻⚕️ *डॉ. गोंधणे, त्वचारोग, ॲलर्जी, सौंदर्य तज्ज्ञ*
🏥 *दि हेल्थ कॅनव्हास*
*महाजनी प्लॉट्स* ,
*जठार पेठ रोड अकोला*
*लँडमार्क : महाजनी हॉस्पिटल च्या समोर*
📞 *8446781238*
Follow us on
👉http://instagram.com/dr.ts_gondhane
(जाहिरात)