ताज्या घडामोडी

फ्लॅट विकताना पार्किंगच्या नावाखाली लूट थांबणार! अलॉटमेंट लेटरमध्ये ग्राहकाला पार्किंगचा हिशेब बंधनकारक

AB7 वृत्तसंस्था

फ्लॅट विकताना पार्किंगच्या नावाखाली लूट थांबणार!अलॉटमेंट लेटरमध्ये ग्राहकाला पार्किंगचा हिशेब बंधनकारक

अकोला : स्वतःच्या हक्काच्या घरात गाडी पार्क करण्यासाठी शेजाऱ्यांशी होणारे वाद आणि बिल्डरांनी दाखवलेली खोटी स्वप्ने, या जाचातून आता सामान्य घर खरेदीदारांची कायमची सुटका होणार आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीनेसदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या अलॉटमेंट लेटर आणि विक्री करारामध्ये पार्किंगचे ‘जोडपत्र’ जोडणे अनिवार्य आहे.(महारेरा) यापुढे केवळ तोंडी आश्वासने देऊन चालणार नाही, तर सदनिकेच्या अलॉटमेंट लेटरमध्ये पार्किंगचा हिशेब देणे बिल्डरांना बंधनकारक केले आहे. फ्लॅट घेताना ‘प्रशस्त पार्किंग मिळेल’ असे सांगून प्रत्यक्षात दोन गाड्यांमध्ये दार उघडण्याइतकीही जागा न देणाऱ्या बिल्डरांविरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत. ‘महारेरा’ने या गंभीर फसवणुकीची दखल घेत आदेश दिला आहे.पार्किंग विकणे आता बेकायदेशीर!अनेक ठिकाणी पार्किंग हा स्वतंत्र घटक समजून त्याची बेकायदेशीर विक्री करून ग्राहकांकडून लाखो रुपये उकळले जात होते. मात्र, ‘महारेरा’ने त्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार पार्किंग हा गृहनिर्माण प्रकल्पाचा अविभाज्य भाग असून, तो स्वतंत्रपणे विकता येणार नाही. विशेषतः ‘ओपन पार्किंग’ हे चटई क्षेत्रात (कार्पेट एरिया) येत नसल्याने विकासक त्यासाठी एक रुपयाही अतिरिक्त आकारू शकत नाही. जर एखाद्या बिल्डरने पार्किंगसाठी वेगळे पैसे मागितले, तर तो आता कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे.ग्राहकांनी सतर्कतेने व्यवहार करावेत !या निर्णयामुळे बिल्डरांवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचा मोठा दबाव निर्माण झाला असून, व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे आता घर घेताना फक्त भिंती नका पाहू, तर तुमच्या हक्काच्या पार्किंगचा लेखी हिशेब तपासून घ्या. जर बिल्डरने नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.