पोरगं चायनीज मांजा वापरणार; पालकांवर गुन्हा नोंद होणारमुलाला पतंग, मांजा घेऊन देताना काळजी घ्या
AB7News
पोरगं चायनीज मांजा वापरणार; पालकांवर गुन्हा नोंद होणारमुलाला पतंग, मांजा घेऊन देताना काळजी घ्या
जळगाव : संक्रांतीला महिनाभर बाकी असला तरी आतापासून पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. पतंगबाजीसाठी कायद्यानुसार नायलॉन आणि चायनीज मांजा विक्री करण्यासाठी बंदी आहे. या मांजामुळे अपघात आणि कधी गंभीर घटनेची भीती असते. त्यामुळे या मांजाची विक्री करणाऱ्यांसह करणाऱ्या मुलांच्या पालकांवरही गुन्हे दाखल होऊ शकतात. वापरFIRनायलॉन व चायनीज मांजामुळे गळ्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याच्या घटना घडल्या आहेतन्यायालयाने बंदी घातलेली असतानाही अनेक व्यावसायिक या मांजाची विक्री करत असतात. गेल्या वर्षी संक्रांतीच्या काळात अशी विक्री सुरू असताना महापालिका तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी बंदी घातलेला मांजा पकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गेल्यावर्षी गंभीर दुखापतीगतवर्षी संक्रांत सणाच्या काळात शहर व परिसरात नायलॉन मांजामुळे १२ पक्षी जखमी झाले तर दोन कबूतर मृत्युमुखी पडले. तसेच पिंप्राळा परिसरातील एका बालिकेच्या पायाची नस कापली गेली होती. याशिवाय एका मुलाचा पंजा कापण्यासह अन्य चारजणांना दुखापत झाली होती.शहरात पतंगबाजी सुरूसंक्रांती सणाला महिना बाकी आहे. असे असले तरी आतापासून पतंगबाजीला सुरुवात झाली आहे.माहिती, तक्रार कुठे द्याल?हा मांजा गाय बगळा, कावळे, घुबड, कबुतर यांच्यासाठी अधिक घातक आहे.या मांजाविषयी महापालिका आरोग्य विभाग अथवा त्या त्या परिसरातील पोलिस ठाण्यात तक्रार देता येऊ शकते.. तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हानायलॉन आणि चायनीज मांजा विक्री, वापरातून कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.चायनीज, नायलॉन मांजावर बंदीनायलॉन, चायनीज मांजा तुटत नसल्याने किंवा नष्ट होत नसल्याने तो घातक ठरतो. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी बळी पडतात किंवा गंभीर जखमी होतात तर वाहनधारक, पादचारी व्यक्तींचा मृत्यू तसेच गंभीर जखमी होतात. त्यामुळे नायलॉन मांजा निर्मिती, साठा व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.