धाराशिवमध्ये गॅस स्टॉकच्या घोळामुळे वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न
कंपनीच्या तपासणीत गॅसच्या स्टॉक आणि वितरणामध्ये तफावत असल्याने तणावाखाली आलेल्या ज्ञानेश्वर माळी या गॅस वितरकाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना धाराशिवमध्ये घडली. या वितरकाने १२०० सिलेंडरचा घोळ घातल्याचं आणि तब्बल सात लाख किमतीच्या सिलेंडरची ब्लॅकने विक्री केल्याची चर्चा आहे. गॅस वितरकावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेचा पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.