ताज्या घडामोडी
रिक्षा घेण्यास पैसे न दिल्याने जळगावमध्ये तरुणाने बेल्टने मारहाण करून केली वडिलांची हत्या
AB7
रिक्षा घेण्यास पैसे न दिल्याने जळगावमध्ये तरुणाने बेल्टने मारहाण करून केली वडिलांची हत्या
चाळीसगाव (जळगाव) येथे एका तरुणाने आपल्या वडलांची लाकडी काठी आणि बेल्टने बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली आहे. भिकन राणा मोरे (वय ६८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी मुलगा कल्पेश मोरे हा काही दिवसांपासून नवीन रिक्षा घेण्यासाठी वडलांकडे पैशांचा तगादा लावत होता. मात्र घरच्या परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांमुळे वडलांनी पैसे देण्यास नकार दिला होता.