ताज्या घडामोडी

एमराल्ड हाइट्स स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साह व देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रम साजरा

AB7 ज्ञानेश्वर निखाडे

एमराल्ड हाइट्स स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साह व देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रम साजरा

अकोला:- राऊतवाडी येथील एमराल्ड हाइट्स स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साह व देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी “जनता राजा” या विषयावर प्रभावी नाटिका, पारंपरिक पोवाडा, भाषणे,उत्साही नृत्य सादरीकरण तसेच तालबद्ध लेझीम सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविले.

शाळेच्या परिसरात जयघोष व प्रेरणादायी घोषवाक्यांसह भव्य रॅली काढण्यात आली. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा सोहळा यशस्वी केला.

हा कार्यक्रम संचालक श्री संजय तुलशन, सौ. अल्पा तुलशनतसेच प्राचार्या सौ. मयुरी डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचा समारोप शौर्य, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत प्रेरणादायी वातावरणात करण्यात आला.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.