अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांना हैराण करणाऱ्या बकरी चोरी टोळीवर पोलिसांनी जोरदार कारवाई
AB7
अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांना हैराण करणाऱ्या बकरी चोरी टोळीवर पोलिसांनी जोरदार कारवाई करत फरार असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील रात्रीच्या चोऱ्यांना मोठा लगाम बसला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
सदर प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३१७(२), ३(५) बीएलएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ६ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान गुर्जवाडा शिवारातून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांची चोरी केली होती. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वी काही बकऱ्या जप्त केल्या होत्या. मात्र उर्वरित आरोपी फरार होते. तपासाची सूत्रे घट्ट पकडत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रोहन ढोके, मोहन शिवरकर व मयूर ढोके यांना अटक केली.