महिला शोषण प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करा!भाजप महिला आघाडीची मागणी
अकोला : शहरात चर्चेत असलेल्या’बिंदी घर’ नामक दुकानाच्या आड झालेल्या महिला शोषण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा महिला आघाडीने गुरुवारी केली आहे. यासंदर्भात भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला आहे. ‘बिंदी घर’ प्रकरणासह धर्मांतराच्या संशयित प्रकारांमध्येही चौकशी करूनअतिरिक्त पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना भाजपच्या महिला पदाधिकारी.दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शहरातील ऑटो रिक्षा व्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. वाहतूक विभागाने लक्ष केंद्रित करून शहरात शिस्त लावावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षकांशीही चर्चा करण्यात आली.निवेदन देताना सुहासिनी धोत्रे, मंजूषा सावरकर, नूतन पिंपळे, महापौरहिंदू सुरक्षा सेवा संघाकडून कारवाईची मागणीहिंदु सुरक्षा सेवा संघाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जिल्हाप्रमुख दिलीप नायसे आणि महिला प्रकोष्ठाच्या अध्यक्षा रविता शर्मा यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यामध्ये शहरातील सौंदर्य प्रसाधने, लेडिज गारमेंटसारख्या दुकांनातील चेंजिंग रूमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांनी तपासणी करावी, महिलांवरील कोणत्याही अन्यायाची माहिती मिळाल्यास किंवा महिलांना त्रास झाल्यास हिंदु सुरक्षा सेवा संघाकडे त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन केले. यावेळी बंटी चौरसिया, संतोष पांडे, मनोज अग्रवाल, मुन्ना उकर्डे, नीलेश मालगे, बबन साखरकर उपस्थित होते.शारदा खेडकर, रूपाली काकडे, आम्रपाली उपर्वट, माजी उपमहापौर वैशाली शेळके, जयश्री फुंडकर, माजी महापौर अर्चना मसने, वैशाली निकम, माया धुळे, वैशाली पालीवाल, चंदा शर्मा, रश्मी कायंदे, राधा तिवारी, ऋता शाह, सुनीता अग्रवाल, मंजूषा शेळके, आरती घोगलिया, नगरसेविका सोनाली अंधारे, पल्लवी मोरे, निखिता देशमुख, अर्चना चौधरी, चंदा ठाकूर उपस्थित होत्या.