ताज्या घडामोडी

पत्रकारांशी उद्धट वर्तन; एसटी कंडक्टरचा मनमानी कारभार उघडशासन मान्य सवलती नाकारणारा शेगाव–अकोला बसमधील कंडक्टर; कारवाईची जोरदार मागणी

AB7

पत्रकारांशी उद्धट वर्तन; एसटी कंडक्टरचा मनमानी कारभार उघडशासन मान्य सवलती नाकारणारा शेगाव–अकोला बसमधील कंडक्टर; कारवाईची जोरदार मागणी

 

अकोला : गुरुवार दिनांक 5/2/ 2026 रोजी शेगाव येथून अकोल्याकडे येत असताना MH49 BZ 7934 क्रमांकाच्या एसटी बसमध्ये एका मान्यताप्राप्त पत्रकारासोबत अत्यंत उद्धट व अपमानास्पद वर्तन केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शासनाने अधिकृतरित्या मान्य केलेली पत्रकार सवलत असतानाही संबंधित कंडक्टरने ती थेट नाकारत “नाही” असे उत्तर दिले आणि कोणतीही तपासणी न करता प्रवाशाशी वाद घालण्यास सुरुवात केली. पत्रकाराने शांतपणे शासन निर्णयाची माहिती दिली असता, संबंधित कंडक्टर ऐकण्याच्या मनःस्थितीत नसून, “तुम्ही बसा, चेकिंग झाली तर तुमच्या रिस्कवर बसा” असे उद्दाम वर्तन करत उद्धट शब्द वापरले. अखेर पत्रकाराने वाहतूक नियंत्रण शाखेला फोन करून कंडक्टरकडे फोन दिल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंडक्टरच्या मशीनमध्ये तपासणी करून पत्रकार सवलत उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले, त्यानंतरच प्रवाशाला बसमध्ये बसू देण्यात आले. हा प्रकार केवळ पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनापुरता मर्यादित नसून, सामान्य नागरिकांशी हे कंडक्टर कसे वागत असतील, याचेही हे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. शासन सवलती म्हणजे “फुकट प्रवास” असल्याचा गैरसमज अनेक कंडक्टरांकडे असून, या सवलतींचा खर्च शासनाकडून महामंडळाला दिला जातो, याची साधी माहितीही काही कर्मचाऱ्यांना नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, शेगाव–अकोला ही बस दिवसभर फेऱ्या मारत असल्याने, अशा प्रकारच्या कंडक्टरमुळे अनेक प्रवाशांना मानसिक त्रास, अपमान आणि अडचणींचा सामना करावा लागत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रमुख मागण्या :संबंधित उद्धट कंडक्टरवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावीसर्व कंडक्टरना तिकीट मशीनमधील सवलती व शासन निर्णयांचे सक्तीचे प्रशिक्षण द्यावेप्रशिक्षण पूर्ण न करता ड्युटीवर पाठवू नयेप्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. एसटी महामंडळाने अशा गंभीर बाबींकडे दुर्लक्ष न करता, प्रवासी व पत्रकारांचा सन्मान राखण्यासाठी तत्काळ ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिक व पत्रकारांकडून होत आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.