बिंदी घर महिला शोषण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा – भाजपा महिला आघाडीची मागणीऑटो रिक्षा शिस्त, शाळांसमोरील गर्दी व महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाकडे निवेदन
AB7
बिंदी घर महिला शोषण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा – भाजपा महिला आघाडीची मागणीऑटो रिक्षा शिस्त, शाळांसमोरील गर्दी व महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाकडे निवेदन
अकोला : अकोला शहरातील बिंदी घर महिला शोषण प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून मास्टरमाइंडला अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासोबतच धर्मांतराच्या संशयित प्रकरणाचीही सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपा महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही निवेदन पाठवून महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अकोला शहरात ऑटो रिक्षांची कोणतीही शिस्त नसून गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याच्या मधोमध, टर्निंग पॉइंटवर तसेच शाळांसमोर मोठ्या प्रमाणात ऑटो उभे राहत असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. याचा गैरवापर काही असामाजिक तत्त्वांकडून होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबत वाहतूक विभागाने तातडीने लक्ष घालून ऑटो उभे करण्यासाठी निश्चित ठिकाणे (स्टँड) लवकरात लवकर निश्चित करावीत, अशी मागणी करण्यात आली. शाळांशी संबंधित अनेक तक्रारी पालकांकडून येत असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलण्यात यावीत, अशीही मागणी महिला आघाडीने केली. ऑटो चालकांकडून असभ्य वर्तन, नियमभंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांशीही चर्चा करून बिंदी घर प्रकरणातील आरोपी व सूत्रधारांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात भाजपा महिला आघाडी अकोला जिल्हा ग्रामीण व महानगर अध्यक्षा सौ. सुवासिनीताई धोत्रे, सौ. मंजुषाताई सावरकर, सौ. रूपालीताई काकडे, आम्रपालीताई उपर्वट, वैशालीताई शेळके, जयश्रीताई फुंडकर, महापौर सौ. शारदाताई खेडकर, अर्चनाताई मसने, वैशालीताई निकम, मायाताई धुळे, वैशालीताई पालीवाल, चंदाताई शर्मा, रश्मीताई कायंदे, राधाताई तिवारी, ऋता ताई शहा, सुनीताताई अग्रवाल, मंजुषाताई शेळके, आरती धोगलिया, सोनालीताई अंधारे, पल्लवीताई मोरे, निकिताताई देशमुख, अर्चनाताई चौधरी, चंदाताई ठाकूर यांच्यासह भाजपा नगरसेविका, महिला पदाधिकारी व ग्रामीण भागातील महिलांचा समावेश होता.