*आरोग्य शिबीर संपन्न*
दिनांक १ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी किर्ती नगर, गौरक्षण रोड, अकोला स्थित मातोश्री पार्क येथे *अस्थिरोग निदान व हाडांची ठिसुळता तपासणी शिबिर* संपन्न झाले. सदर शिबिर होमिओपॅथिक फिमेल डॉक्टर असोसिएशन व गणराया ऑर्थोकेअर हाॅस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गणराया ऑर्थोकेअर हाॅस्पिटल चे संचालक *अस्थिरोग तज्ञ डॉ. सुजित सुनिल फोकमारे* यांनी रूग्ण तपासणी करून औषधोपचार केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्रमांक १५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा.श्री. हरिषभाई आलिमचंदानी, मा.श्री. बाळासाहेब टाले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास २०० रूग्णांची हाडांची ठिसुळता तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले.