आमदार अमित देशमुखांच्या कारसमोर तरुणाची हत्या, लातूरमधील धक्कादायक प्रकार
लातूरच्या आंबेडकर चौकात प्रज्वल मस्के या तरुणाची दोन मित्रांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ‘तुझा कायमचा बंदोबस्त करतो’ असे म्हणत आरोपींनी प्रज्वलवर सपासप वार केले. घटनास्थळावरून जात असताना आमदार अमित देशमुख यांनी जखमीला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गणेश गायकवाड व भीमा सूर्यवंशी या दोन्ही आरोपींना पहाटे अटक करून दोन दिवसांची कोठडी मिळवली आहे.