नवीन उत्पादन शुल्क आणि उपकर लागू झाल्याने सिगारेट, पान मसाला महागले
तंबाखूजन्य उत्पादन असलेल्या सिगारेटवर अतिरिक्त उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) आणि पान मसाल्यावर आरोग्य उपकर (हेल्थ सेस) १ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. यानुसार, या ‘सीन गुड्सवर’ ४०% जीएसटीव्यतिरिक्त नवीन कर आकारले जाणार आहेत. महिनाभरापूर्वी झालेल्या नव्या करांच्या घोषणेनंतर आयटीसीच्या बाजार भांडवलातून सुमारे ११ लाख कोटींची घट झाल्याचे वृत्त आहे.