अकोला महापौरपदी शारदाताई रणजित खेडकर; उपमहापौरपदी अमोल गोगे यांची बहुमताने निवडशहर सुधार समितीचा विजय; ४५ विरुद्ध ३२ मतांनी सत्ता कायम
AB7
अकोला महापौरपदी शारदाताई रणजित खेडकर; उपमहापौरपदी अमोल गोगे यांची बहुमताने निवडशहर सुधार समितीचा विजय; ४५ विरुद्ध ३२ मतांनी सत्ता कायम
अकोला : अकोला महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शहर सुधार समितीने आपले वर्चस्व सिद्ध केले. महापौरपदी शहर सुधार समितीच्या शारदाताई रणजित खेडकर यांची बहुमताने निवड झाली असून, उपमहापौरपदी अमोल गोगे यांनी विजय मिळविला आहे.महापौरपदासाठी ४५ मते; विरोधी आघाडीला ३२ महापौरपदाच्या निवडणुकीत शारदाताई रणजित खेडकर यांना एकूण ४५ मते मिळाली, तर विरोधी पक्षांच्या आघाडीला ३२ मते मिळाली. एम.आय.एम. पक्षाचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले. त्यामुळे शहर सुधार समितीचा स्पष्ट बहुमताने विजय झाला.उपमहापौरपदी अमोल गोगेंचा दणदणीत विजयउपमहापौरपदाच्या निवडणुकीतही शहर सुधार समितीचे उमेदवार अमोल गोगे यांनी ४५ मते मिळवत विजय मिळविला. विरोधी आघाडीला येथेही ३२ मते मिळाली, तर एम.आय.एम.चे तीन सदस्य तटस्थ राहिले.जिल्हाधिकारी वर्षा मीना पीठासीन अधिकारीया निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महापौर व उपमहापौरपदाच्या पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तर महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.शहर सुधार समितीचा सत्तेवर शिक्कामोर्तबमहापौर व उपमहापौर दोन्ही पदांवर विजय मिळवत शहर सुधार समितीने अकोला महापालिकेतील सत्तेवर आपला शिक्कामोर्तब केला आहे. या निकालामुळे महापालिकेतील सत्तासमीकरणे स्पष्ट झाली असून, आगामी काळात शहर विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.