ताज्या घडामोडी

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण पुणेः येरवडा कारागृहात एका कैद्याला बेदम

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण

पुणेः येरवडा कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवकरप्पा गराळे (६५) असे जखमी कैद्याचे नाव आहे, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैदी फजिल अहमद अब्दुलकयुम अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा कारागृहातील हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखलदिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार, शिक्षा भोगत असलेले गराळे आणि अन्सारी यांना कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे खुल्या कारागृहात काम देण्यात आले होते. खुल्या कारागृहातील बराक क्रमांक एक परिसरात त्यांच्यात वाद झाला. या वादातून अन्सारीने गराळे यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारले, ज्यामुळे गराळे फरशीवर पडून जखमी झाले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.