ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय वुशू पंच परीक्षा उत्तीर्ण

AB7News ज्ञानेश्वर निखाळे

राज्यस्तरीय वुशू पंच परीक्षा उत्तीर्ण

अकोला:-दि. 21 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र अँम्युचअर वुशू असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वुशू पंच परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली.या परीक्षेमध्येवासुदेव वाघ पाटील, डॉ. खुशबू चोपडे, रितिक सारवान, सौरभ सापधरे, ओम सारवान, फ्लोरेन्स नाशीककर, सोनु खारीया, साक्षी जोगे व शिवाणी पुंडकरयांनी यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांची या सर्व यशस्वी पंचांचे सामाजिक कार्यकर्त्यामा. सुहासिनीताई धोत्रे, मा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सतीशचंद्र भट्ट, जिल्हा क्रीडा परिषद सदस्य मा. सैय्यद जावेद अली, महाराष्ट्र अँम्युचअर कराटे असोसिएशन अध्यक्ष तथा अकोला जिल्हा अँम्युचअर वुशू असोसिएशन अध्यक्ष सिहान अरुण सारवान, महाराष्ट्र अँम्युचअर वुशू असोसिएशनचे महासचिव मा. सुभाष उरकुडे तसेच महाराष्ट्र अँम्युचअर वुशू असोसिएशनचे अध्यक्ष तथा मा. मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक कुमार मसराम सरयांनी मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.