शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग
तेल्हारा : विवाहितेस जातीवाचकशिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून तालुक्यातील बेलखेड येथील नरेश सीताराम पालीवाल (४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने रविवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिला एका दुकानासमोर रस्त्यावर उभीअसताना तिने आरोपीस फटाके फोडण्यास हटकले व ‘येथे पतंगाचे दुकान आहे, पुढे फटाके फोडा,’ असे सांगितले. यावरून आरोपीने वाद घालून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली, तसेच तिचा हात पकडून लोटल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी व तिच्या पतीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पळ काढला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून त्याच दिवशी तेल्हारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.