राज्यस्तरीय “ॲग्रोटेक 2025” साठी कृषी विद्यापीठ सज्जस्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त 27 ते 29 डिसेंबरदरम्यान भव्य कृषी महोत्सवशाश्वत शेती व समृद्ध शेतकरी संकल्पनेचा प्रत्यक्ष अविष्कारविदर्भासह राज्य-देशभरातील शेतकरी, युवक व कृषी उद्योजकांसाठी ज्ञान-तंत्रज्ञानाची पर्वणीअत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे 500 हून अधिक स्टॉल्सड्रोन, एआय-आधारित निविष्ठा, यंत्र-अवजारे, जैविक-नैसर्गिक शेतीचे विशेष दालनपुष्पप्रदर्शन व पशुप्रदर्शन ठरणार आकर्षणाचे केंद्र
AB7
राज्यस्तरीय “ॲग्रोटेक 2025” साठी कृषी विद्यापीठ सज्जस्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त 27 ते 29 डिसेंबरदरम्यान भव्य कृषी महोत्सवशाश्वत शेती व समृद्ध शेतकरी संकल्पनेचा प्रत्यक्ष अविष्कारविदर्भासह राज्य-देशभरातील शेतकरी, युवक व कृषी उद्योजकांसाठी ज्ञान-तंत्रज्ञानाची पर्वणीअत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे 500 हून अधिक स्टॉल्सड्रोन, एआय-आधारित निविष्ठा, यंत्र-अवजारे, जैविक-नैसर्गिक शेतीचे विशेष दालनपुष्पप्रदर्शन व पशुप्रदर्शन ठरणार आकर्षणाचे केंद्र
अकोला : कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंती दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील क्रीडांगणावर दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2025 दरम्यान संपन्न होणाऱ्या तीन दिवसीय राज्यस्तरीय “ॲग्रोटेक 2025 या भव्यदिव्य कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव, पुष्प प्रदर्शनी, पशुप्रदर्शनी व चर्चासत्राचे आयोजनाच्या प्रत्यक्ष तयारीने आता वेग घेतला असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, आत्मा संचालक, महाबीज,उमेद अभियान, महिला आर्थिक विकास मंडळ, पाणी फाउंडेशन, रिलायन्स फाउंडेशनसह इतर सहभागी संस्था तसेच कृषी विद्यापीठांतर्गत सर्व कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र तथा इतर विभाग यंदा संपन्न होणाऱ्या कृषी प्रदर्शन व चर्चासत्रातून शेतकरी बंधू भगिनींना अधिकाधिक फायदेशीर तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचवत ‘शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी’ संकल्पना कृतीत आणण्यासाठी मदत होईल यावर भर देत अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनी, युवक युवती, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बचत गट, प्रयोगाशील- प्रगतिशील शेतकरी, शेती क्षेत्रात सेवारत मंडळी, कृषी पदवीधर आदींना कृषी प्रदर्शनाविषयी अवगत करून अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान कृषी विषयक प्रक्रिया उद्योग यंत्र अवजारे आदी प्रत्यक्ष बघत इतरांना देखील याविषयी अवगत करावे असे आवाहन करीत आहेत. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदरवाडे यांचे सह विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे (नागपूर), राजेंद्र घोरपडे (अमरावती) तथा विदर्भातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा यांचे सह विद्यापीठ स्तरीय संशोधक, विभाग प्रमुख आणि इतर अधिकारी कर्मचारी वर्ग राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीच्या प्रचार प्रसारासाठी तन-मन-धनाने परिश्रम घेत आहेत. केवळ विदर्भच नव्हे तर राज्यासह इतर राज्यांमधून शेतकरी बंधू भगिनींना युवक युवतींना या प्रदर्शनीची ओढ लागलेली असते. यंदा सुद्धा अतिशय भव्यदिव्य प्रमाणामध्ये या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनी, कृषी महोत्सव, चर्चासत्राचे आयोजन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात करण्यात आले असून 4 मोठे डोम व इतर माध्यमातून 500 हून अधिक स्टॉल उभारण्यात येत असून यामध्ये राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, राज्य शासनाचा कृषी विभाग, जैविक शेती मिशन, महाबीज, नैसर्गिक शेती अभियानासह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, कृषी निविष्ठांचे उत्पादक कंपन्या, यंत्र-अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, बी- बियाणे, खते,औषधे,सेंद्रिय निविष्ठा आदींच्या उत्पादक कंपन्या यासह कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निविष्ठा उत्पादक कंपन्या यासह कृषी विद्यापीठातून अभ्यासक्रम शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या आणि स्वतः उद्योजक म्हणून सेवारत असणाऱ्या कृषी पदवीधरांचे दालने,विदर्भातील स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषी पूरक उत्पादने व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील समाविष्ट आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी अत्याधुनिक शेती व्यवसायातील नव-नवीन नाविन्यपूर्ण संधीचे प्रदर्शन या निमित्ताने शेतकरी बंधू- भगिनींना बघावयास मिळणार असून ड्रोन-तंत्रज्ञानासह स्वयंचलित यंत्रे, अवजारे,पीक संरक्षणाचे विविध पद्धती, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या अनेक जाती फळे, फुले रानभाज्या आदींचे प्रदर्शन निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे. यंदाच्या प्रदर्शनीचे दुसरे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र डोम मध्ये संपन्न होणारे पुष्प प्रदर्शन व शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित पशुप्रदर्शन आकर्षणाचे केंद्र सिद्ध होणार असून प्रदर्शनीला भेट देणाऱ्यांना पर्वणीच ठरणार आहेत. तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन येथे 27 डिसेंबर 2025 रोजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर संपन्न होणार असून मंडप उभारणीचे काम नुकतेच कुलगुरू शरद गडाख यांचे विशेष उपस्थितीत संपन्न झाले याप्रसंगी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने, शिक्षण संचालक डॉ. देवानंद पंचभाई, अधीष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे,सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे, विद्यापीठ अभियंता सुनील थोटांगे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नितीन कोष्टी, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदींचे विशेष उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी इव्हेंट मॅनेजर बालाजी मल्टीमीडिया सर्विसेसचे नरेन काकडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच सदर राज्यस्तरीय प्रदर्शनीला विदर्भातील कानाकोपऱ्यातून शेतकरी बंधू-भगिनींनी भेट द्यावी या हेतूने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेत विदर्भातील दोन्हीही विभागांचे कृषी सहसंचालक, सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व प्रकल्प संचालक आत्मा, विद्यापीठाचे सर्व संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्राचार्य, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख आदींची आढावा सभा (हायब्रीड मोडमध्ये) संपन्न होऊन “ॲग्रोटेक 2025″चे यशस्वी आयोजनासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आश्वासित केले. यंदा देखील सदर प्रदर्शनीला देशभरातील लाखो शेतकरी भेट देतील व ग्रामीण भागातील युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी, शेती आणि शेतीपूरक व्यवसायांचे माध्यमातून आदर्श ग्राम निर्मितीसाठी,रोजगारासह स्वयंरोजगाराचे निर्मितीसाठी व एकंदरीतच शाश्वत जीवनमानासाठी या तीन दिवसीय प्रदर्शनीतून निश्चितच आशेचा किरण गवसत कृषिप्रधान संस्कृती जोपासण्यात हातभार लागेल हा आयोजकांना आत्मविश्वास आहे.