ताज्या घडामोडी
रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ म्हणालो होतो, अपघातानंतर अजित पवारांच्या चालकाची प्रतिक्रिया
AB7
रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ म्हणालो होतो, अपघातानंतर अजित पवारांच्या चालकाची प्रतिक्रिया
मुंबईतील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मीटिंग्स रात्री लवकरच संपल्या होत्या. यामुळे अजितदादांना आपण रात्रीच कारने बारामतीला जाऊ असे म्हणालो, पण दादांच्या पुढे कोण जाणार? दादा मला म्हणाले, तू पुण्याला ये, मी सभा आटोपून पुण्यात येतो, मात्र बुधवारी सकाळीच ही घटना घडली. आता माझं आयुष्यच थांबलं आहे, अशा शब्दांत अजित पवारांचे चालक श्यामराव मनवे (७१) यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.