ताज्या घडामोडी

मूर्तिजापुरात पती-पत्नीचा विजय

AB7News

मूर्तिजापुरात पती-पत्नीचा विजय

अकोला : मूर्तिजापूर नगरपरिषदेच्याएकाच प्रभागातील निवडणुकीत पती-पत्नी विजयी झाले आहेत. त्यांच्या नावाने विजयाची नोंद झाली आहे. प्रभाग क्रमांक १ अ आणि ‘ब’मधून सरनाईक दाम्पत्य अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. शुभांगी सरनाईक यांनी भाजपच्या उमेदवाराचा तर संदीप सरनाईक यांनी अपक्ष उमेदवाराचा पराभव केला आहे. पतीला ७२० तर पत्नीला ६५२ मते मिळाली आहेत.अकोटमध्ये काँग्रेसचे नेते दीपक बोडखे यांच्या पत्नीचाही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. बोडखे यांनी २०२४ मध्ये अकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अकोटमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मो. बद्रुज्जमा यांच्या पत्नीचाही पराभव झाला आहे.आमदार देशमुख यांचा बाळापुरात जोरउद्धवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या बाळापूर नगरपरिषदेत त्यांच्या पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. अकोटमध्ये त्यांच्या पक्षाचे २ नगरसेवक निवडून आले आहेत.भारसाकळेंचे मतदारसंघातील वर्चस्व अबाधित !अकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कार्यक्षेत्रातील तीनही नगरपरिषदा भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. त्यांच्या पक्षाची कामगिरी उत्तम असल्याने त्यांचा झेंडा मतदारसंघात फडकला आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीष पिंपळे यांनी त्यांचे होमटाऊन राखले. मात्र, मतदारसंघातील बार्शिटाकळी नगरपंचायतीत पक्षाची कामगिरी ढेपाळली आहे.अपक्षांनीही मारली बाजीविशेष म्हणजे, या निवडणुकीत अपक्षांचा आकडा चांगलाच वर गेला आहे. तीन नगरपरिषदांत अपक्षांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये बार्शिटाकाळी, तेल्हारा प्रत्येकी-५, मूर्तिजापूर-४ तर बाळापुरात एक अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत.एमआयएम, नगरविकासची मुसंडीअकोट नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला एमआयएमच्या उमेदवाराने काही फेऱ्यांपर्यंत चांगलीच टक्कर दिली. अखेरच्या फेरीपर्यंत उमेदवार सै. फिरोजाबी शरिफ यांना १०६५७ मते मिळाली. त्यांना दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. तर याच नगरपरिषदेत या पक्षाचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. बाळापुरात नगर विकास फ्रंटचे १० नगरसेवक विजयी झाले आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.