ताज्या घडामोडी

चाळीसगावला नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रतिभा चव्हाणभाजपला ३६ पैकी २४ जागा, शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख पराभूत, निवडणुकीत अनेक दिग्गज पराभूत, १६ टेबलवर झाली मतमोजणी

AB7News

चाळीसगावला नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रतिभा चव्हाणभाजपला ३६ पैकी २४ जागा, शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख पराभूत, निवडणुकीत अनेक दिग्गज पराभूत, १६ टेबलवर झाली मतमोजणी

 

चाळीसगाव :-जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव नगरपालिकेवर भाजपने बहुमताचा झेंडा फडकविला असून, थेट नगराध्यक्षपदी प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी शहर विकास आघाडीच्या पद्मजा राजीव देशमुख यांचा ६०१२ मतांनी पराभव केला. एकूण ३६ पैकी भाजपने २४, शहर विकास आघाडी १०, तर दोन अपक्षांनाही कपाळी विजयाचा टिळा लागला.रविवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी १० वाजता अगोदर टपाली मतदानाची मोजणी झाली. एकूण १६ टेबलवर ७२ कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.विजयानंतर जल्लोष करताना नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण आणि भाजपाच्या कार्यकर्त्या.प्रतिभा चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली. मतमोजणीच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या. एका फेरीत दोन प्रभागांतील मतमोजणी झाली. नवव्या फेरी अखेर प्रतिभा चव्हाण यांना ३२२३८, तर शविआच्या पद्मजा देशमुख यांना २६२२६ मते आम आदमी पार्टीचे अँड. राहुल जाधव यांना ४३४, तर राष्ट्रवादीचे (अजित पवार) समाधानपाटील यांना ३५३ मते मिळाली.कुणाला किती जागाभाजपाकाँग्रेसशिवसेनाराष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)00राष्ट्रवादी पार्टी00अपक्ष२इतर१०भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाटील यांचा पराभवभाजपचे शहराध्यक्ष नितीन पाटील यांचा प्रभाग ३मधून पराभव झाला. अवघ्या ३५ मतांच्या फरकाने येथे शविआचे दीपक केली होती. त्यांना ८९५ मते मिळाली आहे. पाटील यांनी विजय मिळविला. भाजपच्या राकेश बोरसे यांनी बंडखोरीचाळीसगाव नगरपरिषद निवडणूक निकालप्रभाग क्रमांक १ (अ) : करणसिंग राजपूत (भाजप) २२४६, प्रभाग १ (ब): मनीषा पाटील (भाजप) २२६६, प्रभाग २ (अ) राहुल मस्के (शहर विकास आघाडी) १३८०, प्रभाग क्र. २(ब): वैशाली मोरे (शहर विकास आघाडी) १५३७, प्रभाग ३ (अ) मधून दीपक पाटील (शहर विकास आघाडी) १२६१, प्रभाग ३ (ब): स्वाती शिरुडे (भाजप) १७१६, प्रभाग ४(अ) : हर्षल चौधरी (भाजप) २२८६, प्रभाग क्र. ४ (ब): प्राजक्ता कोठावदे (भाजप) १८५७.प्रभाग ५ (अ): रूपाली चौधरी (भाजप) २६९०, प्रभाग ५ (ब) युवराज जाधव (भाजप) १७७८, प्रभाग ६ (अ): योगेश खंडेलवाल (भाजप) १६३८, प्रभाग ६ (ब): योजना पाटील (भाजप) १४९०, प्रभाग ७ (अ) स्वाती राखुंडे (शहर विकास आघाडी) २०३५, प्रभाग ७ (ब): राजेंद्र चौथरी (अपक्ष), १४२८. प्रभाग ८ (अ) पायल कारडा (भाजप) १०९६, प्रभाग ८ (ब) सोमसिंग राजपूत (भाजपा) १६७५. प्रभाग क्र. ९ (अ) विजया पवार (शहर विकास आघाडी) १४४२. प्रभाग ९(ब) पूनम अहिरे (शहर विकास आघाडी) १६४०, प्रभाग क्र. १० (अ) : भारती मराठे (भाजपा) १५७२, प्रभाग १० (ब) संभाजी गवळी (भाजपा) १३६८, प्रभाग ११ (अ): हर्षदा बाळू पवार (भाजपा) १९१६.प्रभाग ११(ब): अभय वाघ (भाजप) १४३७, प्रभाग १२ (अ) अनिल चौधरी (भाजपा) २०८१, प्रभाग १२ (ब): सायली जाधव (अपक्ष) २३६७, प्रभाग १३ (अ): फकिरा बेग जमाल बेग मिर्झा (भाजपा) २३५०, प्रभाग १३ (ब): मेघा चौधरी (भाजपा) १८९८, प्रभाग १४ (अ) : शेख इमरान शब्बीर (शहर विकास आघाडी) २००६, प्रभाग १४ (ब) रुबीना खान (भाजपा) १९६५. प्रभाग १५ (अ) शेख वसीम रज्जाक (भाजपा) १३१०, प्रभाग १५ (ब): नलिनी चौधरी (भाजपा) १६६४, प्रभाग १६ (अ): अभिषेक राजीव देशमुख (शहर विकास आघाडी) १८२१, प्रभाग १६ (ब) मधून राजश्री राजपूत (शहर विकास आघाडी) १८०६, प्रभाग १७ (अ) उज्ज्वला राजपूत (भाजपा) १६३०, प्रभाग १७ (ब): प्रशांत कुमावत (भाजपा) २१०६, प्रभाग १८ (अ): धर्मा बच्चे (भाजपा) ७९२. प्रभाग १८ (ब) सविता ठाकूर (शहर विकास आघाडी) ११३६.रूपाली जाधव यांना सर्वाधिक मतेप्रभाग क्र. ५ मधून विजयी झालेल्या भाजपच्या रूपाली प्रभाकर जाधव यांना सर्वाधिक २६२० मते मिळाली. प्रभाग क्र. ४मधून हर्षल चौधरी यांनी भाजपचा विजय साकारताना सर्वाधिक १६९९ मतांचे मताधिक्य घेतले.३० नवे चेहरे, सहा माजी नगरसेवकांचे कमबॅकविजयी झालेल्या ३६ नगरसेवकांमध्ये ३० चेहरे नवखे असून, यात सर्वाधिक भाजपच्या उमेदवारांचा समावेश आहे. सहा माजी नगरसेवकांनी पुन्हा कमबॅक केले आहे. यात राजेंद्र चौधरी व सायली रोशन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी करीत विजयश्री खेचून आणला. १३ माजी नगरसेवकांना मतदारांनी या निवडणुकीत नाकारले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.