ताज्या घडामोडी

मिरवणुकीत भंडाऱ्याने पेट घेतला, १६ जण होरपळले

AB7News

मिरवणुकीत भंडाऱ्याने पेट घेतला, १६ जण होरपळले

जेजुरी : जेजुरी येथे निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करताना अचानक भंडाऱ्याचा भडका उडला. या घटनेत सुमारे १६ जण होरपळले. यात निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे आणि त्यांचे पती राहुल घाडगे यांच्यासह नगरसेविका स्वरूपा खोमणे यांचा समावेश आहे. ही घटना दुपारी ३ वाजता घडली. घटनेत होरपळलेल्या जखमींना तातडीने येथील खासगी आणि सरकारी रुग्णालयातदाखल करण्यात आले आहे. ज्वलनशील आणि भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे मोठा भडका उडाल्याचे सांगण्यात आले.नेमके घडले काय ?निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्ते गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी भंडाऱ्याने अचानक पेट घेतल, तसेच त्याचा स्फोटही झाला. भेसळयुक्त भंडाऱ्याच्या विक्रीवर कडक कारवाई करणार असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी सांगितले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.