ताज्या घडामोडी

सातारा येथील अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे गौतम सूर्यवंशी यांना निमंत्रण

AB7News

सातारा येथील अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे गौतम सूर्यवंशी यांना निमंत्रण

 

सेलू :सातारा येथे दि.१ते ४ जानेवारीस होणाऱ्या ९९ व्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सेलू येथील ज्येष्ठ कवी तथा नूतन महाविद्यालयातील निवृत्त अधीक्षक श्री.गौतम सूर्यवंशी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.    प्रसिद्ध कवी मिश्किलीकार श्री.अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक.२ जानेवारीस होणाऱ्या कविसंमेलनात त्यांचा सहभाग आहे.श्री.सूर्यवंशी हे सेलूतील नामांकित ज्येष्ठ कवी असून त्यांनी अखिल भारतीय संमेलनासह ,राज्य व विभागीय विविध स्तरावरील साहित्य व्यासपीठावरून आपल्या कविता प्रभावीपणे सादर केल्या आहेत. गायन,गीतकार,पत्रकारिता,संपादन, साहित्य,गझल कार्यशाळा, आदि क्षेत्रात सहभाग नोंदवित त्यांनी विविध सन्मान प्राप्त करीत आपला ठसा उमटविला आहे.विविध शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक व वित्तीय संस्थाशी ते संलग्न असून स्व.पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचेकडून त्यांच्या हिन्दी कवितेची दखल घेण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डाॅ.विनायकराव कोठेकर प्रशासकीय अधिकारी तथा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष डाॅ.शरद कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.