ताज्या घडामोडी

वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णयजुन्नर भागात दहशत माजवणारे पन्नास बिबटे गुजरातला जाणार

AB7News

 

 

वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णयजुन्नर भागात दहशत माजवणारे पन्नास बिबटे गुजरातला जाणार

 

सोलापूर:-जिल्ह्यातील जुन्नर परिसरात विट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली दहशत आणि नागरिकांचा संताप लक्षात घेता, केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. जुन्नर वन विभागाच्या माणिकडोह बचाव केंद्रातील ५० बिबटे आता गुजरातच्या जामनगर येथील पुनर्वसन केंद्रात हलवले जाणार आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) या स्थलांतरासाठी शुक्रवारी (१९ डिसेंबर) अंतिम मंजुरी दिली आहे. वाढत्या हल्ल्यांचा संदर्भ… गेल्या काही महिन्यांपासून जुन्नर, आंबेगाव

 

आणि शिरूर तालुक्यात बिबट्या-मानव संघर्षाने टोक गाठले आहे. या भागात बिबट्यांच्या हल्ल्यात निष्पाप बालकांचे बळी गेले आहेत. शेतकरी आणि महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सप्टेंबरपासून या परिसरात मानव-बिबट्या संघर्षांची तीव्रता वाढली. कुमशेत, पिंपरखेड येथे लहान मुलांवरील हल्ल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले होते. मागील दीड दोन महिन्यांत जुन्नर वन विभागाने तब्बल ७५ बिबटे पकडून माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवले आहेत. त्यामुळे आता लवकरच ५० बिबटे हे हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

जखमींच्या उपचारांचा खर्च वन विभाग करणार

 

मुंबई:-मीरा भाईंदर येथील पारिजात इमारतीत घुसलेल्या बिबट्याने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात सात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची दखल घेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी लोकवस्तीला भेट देऊन पाहणी केली. यापुढे बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी रुग्णांच्या उपचारांचा खर्च शासन

 

करेल, अशी घोषणा वनमंत्र्यांनी केली. या वेळी वनमंत्र्यांकडून पाच जख

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.