ताज्या घडामोडी

उबाठा व नवनिर्माण सेनेच्या युतीचा अकोल्यात पेढे वाटून जल्लोष साजरा

AB7News ज्ञानेश्वर निखाडे

उबाठा व नवनिर्माण सेनेच्या युतीचा अकोल्यात पेढे वाटून जल्लोष साजरा


अकोला – मा. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ऊबाठा मध्ये पत्रकार परिषदेत युती घोषित करण्यात आली. त्यामुळे अकोला अकोट येथील सर्व रेल्वे प्रवासी संघटना आणि मनसे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे जनहित कक्ष व विधीचे ॲड. नंदकिशोर शेळके यांच्या नेतृत्वात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. भविष्यातील वाटचाल सुरू केली त्याचा परिणाम महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्ते आनंदी झाले. येणाऱ्या मनपा आणि जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत यांचा परिणाम महाराष्ट्रातील सर्व जनता दाखवेल. मराठी माणसाचा स्वभावाचा गैरफायदा महानगरात घेतला आणि उपऱ्यांनी महानगरात सामान्य नागरिकांना खुप त्रास देणे चालु केले आता त्यांना चपराक बसणार आहे, असे मनसे विधी राज्य सरचिटणीस ॲड. नंदकिशोर शेळके यांनी मिडीयासमोर आपले विचार मांडले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.