धाराशिवकर गूढ आवाजाने हादरले, २ दिवसांपासून नागरिकांमध्ये घबराट
धाराशिव शहर, कळंब, वाशी व भूम परिसरात गेल्या २ दिवसांपासून सातत्याने प्रचंड मोठे गूढ आवाज ऐकू येत असून यामुळे घरातील वस्तू हादरत असल्याचा अनुभव नागरिक सांगत आहेत. या आवाजानंतर परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले की, लातूर किंवा लगतच्या कोणत्याही भूकंप मापन केंद्रावर भूकंपाची अधिकृत नोंद झालेली नाही.