ताज्या घडामोडी

अकोला जिल्ह्यात भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज ; विविध विकासकामांना गती

Akola B7

अकोला जिल्ह्यात भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज ; विविध विकासकामांना गती

 

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात विकासाला नवी चालना देण्यासाठीआज दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हा कार्यक्रम खासदार मा. श्री. अनुपमभाऊ संजयजी धोत्रे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला असून, भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते मार्ग निधी तसेच जिल्हा वार्षिक योजना ३०/५४ अंतर्गत अनेक महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. आकाशजी फुंडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. आमदार रणधीरभाऊ सावरकर भूषविणार आहेत. याशिवाय मा. श्री. बबनरावजी तिरसकर (आमदार), मा. श्री. संतोषजी शिवरकर (जिल्हाध्यक्ष, अकोला ग्रामीण भाजपा), मा. श्री. गणेशजी लोखंडे (मंडळ अध्यक्ष), मा. श्री. विश्वजीतजी कुकडे (मंडळ अध्यक्ष, बाळापूर भाजपा) यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा समावेश असून, नवीन रस्ते बांधकाम, रस्त्यांची सुधारणा, लहान पुलांचे बांधकाम, तसेच स्मशानभूमी सुशोभीकरण यांसारख्या कामांचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये ५० लाख रुपयांचे रस्ते बांधकाम, ३ कोटी ६५ लाख रुपयांची रस्ता सुधारणा, १ कोटी ११ लाख रुपयांचे पूल बांधकाम, १० लाख रुपयांचे स्मशानभूमी सुशोभीकरण, तसेच ५ कोटी ५५ लाख रुपयांची रस्ता सुधारणा अशा विविध कामांचा समावेश आहे. ही कामे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन सुविधांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. कार्यक्रम विविध गावांमध्ये नियोजित वेळेनुसार पार पडणार असून सकाळपासून सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी भूमिपूजन व लोकार्पण सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

एकूणच, अकोला जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, ग्रामीण विकासाला यामुळे निश्चितच गती मिळणार आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.