ताज्या घडामोडी
अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्वांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक गिरीश जोशी व गिरीराज तिवारी यांनी केली आहे
Akola B7 News
अकोला श्री रामनवमी शोभा यात्रेवर असामाजिक तत्त्वांनी श्रीरामपूर अहिल्यानगर इथे दगडफेक केलेल्या घटनेचा श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्थेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून दोषींवर क** कारवाई करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
श्रीरामपूर येथे जय श्री रामाचा जयघोष करत राम प्रगट उत्सव शोभायात्रा निघत असल्यावर असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून शोभायात्रा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा जाहीर निषेध करून अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा व अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्वांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक गिरीश जोशी व गिरीराज तिवारी यांनी केली आहे