बीडच्या माळापुरीतील धक्कादायक घटना, संपत्तीसाठी बायकोला बनवलं बहीण
जमिनीच्या हव्यासापोटी सख्ख्या बहिणीची फसवणूक करणाऱ्या भावाचा धक्कादायक प्रकार बीडच्या माळापुरी येथे समोर आलाय. आबेद खानने २४ ऑक्टोबर २०१४ ला आपली पत्नी वाहिदाला बुरखा घालून ‘बहीण’ म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले व वारसा हक्काच्या जमिनीचे सोडपत्र करुन घेतले. हा प्रकार लक्षात येताच बहिणीने कोर्टात धाव घेतली व कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी आबेद व त्याच्या पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.