ताज्या घडामोडी
काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भीषण अपघात; सुदैवाने बचावले
Akola B7 News
काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भीषण अपघात; सुदैवाने बचावले
भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे दिल्लीतील अधिवेशनासाठी नागपूर विमानतळाकडे जाताना त्यांच्या कारला सोमवारी पहाटे ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या फॉर्च्यूनर कारचा चक्काचूर झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते सुखरूप आहेत. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.