पुण्यात प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिल्याने प्रियकराकडून महिलेची हत्या
आंबेगाव बुद्रुक येथील भिल्लारवाडी जंगलात २५ वर्षीय मनीषा दमाई या महिलेची तिच्याच प्रियकराने गळा आवळून हत्या केली. प्रकाश तिखात्री याने अनैतिक संबंध संपवण्यासाठी मनीषाला जंगलात नेऊन तिचा काटा काढला. १८ मार्च रोजी घडलेल्या या घटनेचा उलगडा दहा दिवसांनंतर झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विवाहित असलेल्या मनीषाने संबंध तोडण्यास नकार दिल्याने प्रकाशने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे.