गावठी कट्ट्यातून ‘मिसफायर’; अमळनेरमध्ये तरुण व्यावसायिकाचा मृत्यू
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्यातून झालेल्या ‘मिसफायर’मुळे ३५ वर्षीय व्यावसायिक अरुण महाजन यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री मित्र भूषण महाजन कट्टा हाताळत असताना अचानक गोळी सुटून अरुण यांच्या छातीत घुसली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी संशयित आरोपी मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा कट्टा कोठून आला आणि गोळी सुटण्यापूर्वी काही वाद झाला होता का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.