ताज्या घडामोडी
पुण्यात मिरवणुकीतील डीजेच्या तीव्र आवाजाचा धक्का बसून महिलेचा मृत्यू, मुलाचा आरोप
Akola B7
पुण्यात मिरवणुकीतील डीजेच्या तीव्र आवाजाचा धक्का बसून महिलेचा मृत्यू, मुलाचा आरोप
ससाणेनगर परिसरात राम जन्मोत्सव मिरवणुकीतील डीजेच्या तीव्र आवाजामुळे ६५ वर्षीय रंजना जाधव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. जाधव मिरवणूक पाहण्यास आल्या असता आवाजामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. वाहतूक कोंडीमुळे उपचारास विलंब झाल्याचा दावा मुलगा सौरभ जाधव यांनी केला. पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून महिलेची आधीच बायपास सर्जरी झाली होती आणि डीजे बंद झाल्यावर ही घटना घडल्याचे सांगितले.