अंबरनाथ येथे पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल केली, अन् मोटार सायकलच पेटली
अंबरनाथच्या नवरेनगर बस स्टॉपजवळ एका दुचाकीला भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार सारंग पोळके यांनी दुचाकीत टाकी फुल होईपर्यंत पेट्रोल भरले होते. यावेळी प्रवासादरम्यान पोळके यांच्या पायाला गरम लागू लागल्याने त्यांनी दुचाकी थांबवली व त्यानंतर अचानक दुचाकीला आग लागली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण पेट्रोलमुळे दुचाकी काही वेळातच जळून खाक झाली.