ताज्या घडामोडी
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
Akola B7 News
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत राज्य सरकारने महत्त्वाची अपडेट दिलीय. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलीय. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X वर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. पोस्टमधील माहितीनुसार, पुढील २-३ दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे.