ताज्या घडामोडी

धर्म संस्कृती परंपरा मानवता संस्कार सोबत हिंदुस्तान ची ओळख असणारे प्रभू रामचंद्र यांच्या प्रगट उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिर परिसरात श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्थापक तसेच श्री राम नगर मित्र मंडळ च्या वतीने भगवान प्रभू रामचंद्राच्या बाल स्वरूपाचे दर्शन तसेच राम खिचडी प्रभू रामचंद्राच्या प्रगट उत्सव निमित्त दुपारी बारा वाजता राम भक्तांसोबत राम खिचडी चे महत्व लक्षात घेऊन दिनांक 26 मार्च गुरुवार रोजी कार्यक्रम करण्यात येत आहे. 

Akola B7

अकोला

धर्म संस्कृती परंपरा मानवता संस्कार सोबत हिंदुस्तान ची ओळख असणारे प्रभू रामचंद्र यांच्या प्रगट उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिर परिसरात श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्थापक तसेच श्री राम नगर मित्र मंडळ च्या वतीने भगवान प्रभू रामचंद्राच्या बाल स्वरूपाचे दर्शन तसेच राम खिचडी प्रभू रामचंद्राच्या प्रगट उत्सव निमित्त दुपारी बारा वाजता राम भक्तांसोबत राम खिचडी चे महत्व लक्षात घेऊन दिनांक 26 मार्च गुरुवार रोजी कार्यक्रम करण्यात येत आहे.

संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र या राजराजेश्वर नगरीमध्ये 27 प्रभू रामचंद्राची मंदिर असून प्रत्येक मंदिराचे महत्त्व असून प्रत्येकाच्या इच्छापूर्ती करणारे राम मंदिर असून मोठे राम मंदिर बिर्ला राम मंदिर तपशी बाबा राम मंदिर माळीपुरातील राम मंदिर सालासर बालाजी राम मंदिर, चतुर्भुज कॉलनी राम मंदिर पूर्ण राम मंदिर रेणुका नगर श्रीराम चौकातील राम मंदिर जेलमधील वाटर परिसरात राम मंदिर, रामदास पेठ मधील मुकुंद मंदिर, सुभाष चौकातील मुळे यांची राम मंदिर, संतोषीमाता राम मंदिर, रामदास मठ राम मंदिर, जलाराम राम मंदिर, खेतान नगर राम मंदिर, अनिकेट, राम मंदिर, उमरी येथील राम मंदिर या मंदिरात श्री प्रभू प्रगट रामोत्सव साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भावी भक्त उपस्थित राहतात.

अखंड रामायण, सामूहिक रामरक्षा, रामायण मनका कार्यक्रम जवळपास साडेचारशे कार्यक्रम अकोला शहरांमध्ये विविध ठिकाणी सामाजिक धार्मिक क्षेत्रातील नागरिक सहभागी होतात आपापल्या परीने भक्ती आणि श्रद्धा विश्वास सोबत प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा करतात.

प्रभू रामचंद्राचा बारा वाजता जन्म झाल्यानंतर राम मंदिर परिसरात राम खिचडी प्रसाद वितरण तसेच प्रभू रामचंद्राचा बाल स्वरूपाचे दर्शन कार्यक्रम होणार असून विविध राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी भेट देणार असून दर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा अशी विनंती गिरीश जोशी, गिरीराज तिवारी, अजय गुल्हाने, हरीश चौधरी, संजय अग्रवाल ,सागर भारू का, सुमन देवी अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी कुंजबिहारी जाजू, राम रतन सारडा, अमोल इंगळे सुरेश ढोले बबलू श्रीनाथ, बंसल परिवार, नवल जोशी, नवल शर्मा, राजेश पूर्वे, सतीश गोयंका, एडवोकेट प्रमोद अग्रवाल, मनीषा अग्रवाल, हितेश चौधरी, कृष्णा राठी, संतोष देवके, आशिष शर्मा वसंत लड्डा, जानोरकर, योगेश शर्मा, पवन शर्मा शीला तिवारी , सुनिता जोशी, परसराम इटिक र यांनी केली आहे याप्रसंगी आरती करण्यात येणार आहे व प्रसाद वितरण कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.