संस्कृती संवर्धनासाठी रामनवमी शोभायात्रा समितीची मुहूर्तमेढ राणी सती धाम येथे पुरस्कार वितरण सोहळा; ४५ झाकी, ५५ महिला दिंडी व विविध मंडळांचा पुरस्कार सोहळ्यात गौरव
Akola B7 News
संस्कृती संवर्धनासाठी रामनवमी शोभायात्रा समितीची मुहूर्तमेढ राणी सती धाम येथे पुरस्कार वितरण सोहळा; ४५ झाकी, ५५ महिला दिंडी व विविध मंडळांचा पुरस्कार सोहळ्यात गौरव
अकोला (प्रतिनिधी) : दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला महानगरातील सांस्कृतिक व धार्मिक परंपरा बळकट करण्याच्या उद्देशाने रामनवमी शोभायात्रा समितीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अकोला शहरातील रामनवमी शोभायात्रा मध्य भारतातही अव्वल ठरली असल्याचा गौरवोद्गार मान्यवरांनी व्यक्त केला.
विहिप–श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने शनिवारी स्थानिक राणी सती धाम येथे गतवर्षीच्या रामनवमी शोभायात्रेत सहभागी झालेल्या देखावेकार, झाकीकार तसेच भजनी मंडळांचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामनवमी शोभायात्रा समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा गोवर्धन शर्मा यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्रीराम तसेच माजी आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी माजी विहिप महानगर अध्यक्ष राजू मंजुळकर, कोषाध्यक्ष राहुल राठी, राणी सती धामचे अध्यक्ष जगदीशप्रसाद बाछुका, नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, धीरज खंडेलवाल, किशोर मांगटे पाटील, विलास अनासाने, मनीष बाछुका यांच्यासह महिला शाखेच्या अर्चना शर्मा, पुष्पा वानखडे, चंदा शर्मा, सिमरन अम्मा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहिप-बजरंग दलाचे सूरज भगेवार यांनी केले. त्यांनी रामनवमी शोभायात्रा समितीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वागतपर मनोगत समितीचे अध्यक्ष अरुण शर्मा यांनी व्यक्त केले. मान्यवरांचा परिचय संदीप वाणी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन बाळकृष्ण बिडवई व मनीषा भुसारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितीन जोशी यांनी मानले. यावेळी गतवर्षीच्या रामनवमी शोभायात्रेत सहभागी झालेल्या ४५ झाकी मंडळे, ५५ महिला दिंडी मंडळे, १० पुरुष दिंडी मंडळे तसेच १० घोडेस्वार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात रामनवमी शोभायात्रा समितीचे कार्य केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित नसून समाजातील विविध क्षेत्रात मानवीय सेवा आणि सामाजिक उपक्रमांद्वारेही सातत्याने सुरू असल्याचे नमूद केले. कार्यक्रमास गोपाल महाराज राजवैद्य, संजय दुबे, हरिओम पांडे, निलेश पाठक, पंकज खत्री, संतोष बुरडे, मनमोहन दुबे, राहुल कानडे, प्रसाद देशपांडे, राजा नागवानी, प्रकाश घोगलिया, नवीन गुप्ता, सुमित शर्मा, प्रियेश शर्मा, जुगल खंडेलवाल, दीपक मायी, संतोष पांडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि सेवाधारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रेखा नालट, सरला देशमुख, कल्पना अडचुले, दिपाली वराडे, संगीता मानकर, प्रीती बुरकुटे, मनीषा देशपांडे, मीरा वानखडे, संतोषी शर्मा, मुक्ता पापडे, चित्रा फाफट, वैशाली शेगोकार, मुक्ता पुरी, सुनंदा गावंडे, अनिता डोंगरे, आशा वळस्कर, दिपाली शिंदे, मालती रणपिसे, सुरेखा नबापुरे, गंगाबाई नबापुरे आदींसह विहिप-रामनवमी शोभायात्रा समितीचे बहुसंख्य सेवाधारी उपस्थित होते. अकोला महानगरातील रामनवमी शोभायात्रा अधिक भव्य व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी समितीचे कार्य भविष्यातही अशाच जोमाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.