महाराष्ट्रावर सर्वात मोठं संकट, पुढील ४८ तास धोक्याचे; IMD चा मोठा इशारा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेनंतर आता विदर्भातील बहुतांश भागात १४ व १५ मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात एक द्रोनीका (अप्पर टफ वे) तयार झाला आहे, त्यामुळे विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसासोबतच ताशी ४०-५० किमी वेगानं वारे देखील वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी दिली.