काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोल्यात जीवघेणा चाकूहल्ला
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोल्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मोहाळा गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटाने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हिदायत पटेल यांनी २०१४ आणि २०१९ ची लोकसभा निवडणूकही लढली होती. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे.