ताज्या घडामोडी

ग्रामीण संस्कृती ही मानवता आणि एकतेचा सूत्र जोइडणारी प्रत्येकाला सुखदुःखात सहभागी होणारी परंपरा असून यात्रा, वेगवेगळे कार्यक्रम हे आनंद देणारी

AB7

अकोला …ग्रामीण संस्कृती ही मानवता आणि एकतेचा सूत्र जोइडणारी प्रत्येकाला सुखदुःखात सहभागी होणारी परंपरा असून यात्रा, वेगवेगळे कार्यक्रम हे आनंद देणारी असून लोक देवता यांच्या यात्रा तीन जिल्ह्याला एकत्रित करणारी माझ्या मतदार संघात असणे हे सौभाग्याची आणि गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील दहीहंडा येथे श्री रूपनाथ महाराज संस्थान यात्रेनिमित्त भाविक भक्तांचे आशीर्वाद भेट तसेच कारसेवा मध्ये सक्रिय सहभाग घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी ग्रामीण संस्कृतीचे जतन केला., श्री रूपनाथ महाराजांचे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला.आमदार रणधीर सावरकर यांनी तीर्थस्थळ म्हणून या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून भाविक भक्तांना या परिसरात सुविधा उपलब्ध करून दिली विकासानिधितून श्री रूपनाथ महाराज संस्थान येथे २ कोटी रू खर्चातून भाविकांच्या सुविधेसाठी भव्य सभागृह बांधण्यात येत आहे.

या भेटी दरम्यान सदर बांधकामाची पाहणी केली व काही सूचना केल्या. परमेश्वराची व परमेश्वररुपी जनता जनार्दनाची आपल्या हातून सेवा पुढेही होत राहो अशी श्री रूपनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.यावेळी संस्थेचे पदाधिकारी गणेशभाऊ पोटे,गोविंद गोयंका,दिलीप मिश्रा,विजुभाऊ मगर, शिरू पाटील मगर संजय आठवले,संतोष मोहरकर,सुभाष भांडे,निलेश जैन,सुशील सहगल,मनोज अग्रवाल, विवेक भरणे राजू कयमखेडे,आशिष मगर,अशपाक भाई,गजानन गोतमारे,राजू लाड,सुनील पोटे,आशिष भोंडे,अनुप अग्रवाल व गावकरी मंडळी उपस्थित होती.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.