ताज्या घडामोडी

उत्कृष्ट उत्कृष्ट प्रशासक, मातीशी जुळलेला कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ बहु आयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी स्पष्ट वक्ता प्रत्येकाला मदत करण्याची मनोवृत्ती असणारा सुखदुःखात धावणारा लोकनेता अजित दादा पवार यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टी परिवाराची फार मोठी हानी झाली

AB7

अकोला ….उत्कृष्ट उत्कृष्ट प्रशासक, मातीशी जुळलेला कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ बहु आयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी स्पष्ट वक्ता प्रत्येकाला मदत करण्याची मनोवृत्ती असणारा सुखदुःखात धावणारा लोकनेता अजित दादा पवार यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टी परिवाराची फार मोठी हानी झाली आहे महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सुद्धा राजकीय क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली अशा शब्दात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

भारतीय जनता पार्टी कार्यालया त संतोष शिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत व भावपूर्ण श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

विधिमंडळात सर्वात आधी येऊन प्रत्येक बाबीचा अभ्यास करून प्रत्येक सभासदाचा सन्मान करून त्यांच्या प्रश्नाची उत्तर देणारा, विरोधकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारा, सामाजिक दायित्व लक्षात घेऊन जात-पात न न पाहणारा न पाहणारे लोकनेता व सर्वांशी विदर्भाच्या विकासामध्ये आशिष अकोल्याच्या अनेक योजनेला चालना देणारे माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्याशी असलेले त्यांचे संबंध परिवार पवार परिवारांचे असलेले नाते यामुळे फार मोठी हानी झाली असून अवेळी मृत्यू होणे हे वेदनादायी व कष्टदायी असून आपण एक चांगला आदर्श मार्गदर्शक गमावला अशाही शब्दात आपल्या भावना आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केल्या.

यावेळी किशोर पाटील विजय अग्रवाल, जयंत ,मसणे, बळीराम सिरस्कार, परिमल कांबळे, अंबादास उमाळे, उषाताई विरक, चंदाताई शर्मा, डॉक्टर किशोर मालोकार विनोद मनवानी, हरीश आलीमचदाणी, माधव मानकर, मनीष गावंडे एडवोकेट रूपाली काकड कृष्णा चव्हाण, किशोर कुचके सतीश ढगे अनिल गरडयांनी सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले प्रास्ताविक एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपा शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या वतीने अकोला लोकसभा मतदार संघाच्या वतीने खासदार अनुप धोत्रे यांनी बारामती येथे जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.