ताज्या घडामोडी

अकोट न.प. मध्ये भाजपच अव्वल ! नगरसेवक पदाच्या ११ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष : काँग्रेसचा सहा जागांवर विजय लोकमत न्यूज नेटवर्क अकोट : नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या माया विवेक धुळे ह्या १५ हजार ९२८ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी एम.आय.एम.च्या सैय्यद फिरोजाबी शरीफ यांचा ५ हजार २७१ मतांनी पराभव केला. नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय व नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीमध्ये प्रारंभीपासून एम.आय.एम.ने आघाडी घेतली होती. प्रभागातील मतदानाची मतमोजणीच्या सुरुवातीलाच सलगपणे एम.आय.एम.ने सदस्य पदाच्या पाच जागांवर विजय मिळविला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराने घेतलेले मताधिक्य शेवटपर्यंत कायम ठेवत दुसरे स्थान मिळविले. शहरातील मध्यभागी असलेल्या तर प्रभागापासून भाजपाच्या मताधिक्यामध्ये सतत वाढ होत गेली. एम.आय.एम.पक्ष मतांची आघाडी थांबली. काँग्रेस मात्र चांगलीच माघारली गेली होती. अखेर भाजपाच्या माया धुळे यांनी दणदणीत विजय मिळविला. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सैय्यद फिरोजाबी शरीफ (एम.आय.एम.) १०६७५, अलका संजय बोडखे (काँग्रेस) ८८५९, गाजीयाबानो मो. बद्रुजमा (रा.कॉ. अ. प. गट) ७६०९, स्वाती मंगेश चिखले (वंचित बहुजन आघाडी) ६३१४, विजया मनोहर चौधरी (उद्धत सेना) १७८१, चंचल सुनील पितांबरवाले (शिंदेसेना) १५७५, अर्शिया तब्बसुम वासीकअली (अपक्ष) ५८१ अशी मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारांनी बहुरंगी कल देत सर्वच पक्षांचे सदस्य निवडून दिले. निकाल घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष माया धुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी प्रमाणपत्र दिले. ‘राष्ट्रवादी’ व एम.आय.एम.च्या मतविभाजनाने भाजपाला संधी विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क आकोटः नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये कोण विजयी होणार याबाबत उत्सूकता लागली होती. नगर परिषदेत ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम.आय.एम.च्या मतविभाजनाने भाजपाला संधी मिळाली. अकोट नगर परिषद मतमोजणीच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होइल व कमी मताधिक्याने उमेदवाराचा विजय होइल, अशी अपेक्षा होती. मात्र एम.आय.एम.ने आघाडी घेत राष्ट्रीय पक्षांना मागे टाकले. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला एम.आय.एम.चे सलग ५ सदस्य विजयी झाले. त्यामुळे मतमोजणीस्थळी एम.आय.एम., भाजपा, काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल, असे दिसून येत होते. या निवडणूकीमध्ये उद्धवसेना, शिंदेसेना यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. काँग्रेसला मिळणारी परंपरागत मुस्लिम समाजाची मते यावेळी पाहिजे त्या प्रमाणात मिळू शकली नाहीत. परंतु निकालाची प्रत्येक फेरी घोषीत होत असताना सातत्याने एम.आय.एम. ला मतांची आघाडी मिळत होती. प्रहारच्या दोन जागा वाढल्या मुस्लिम मतांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम.आय.एम. मध्ये विभाजन झाल्याने भाजपाच्या मताधिक्यात वाढ होत गेली. राष्ट्रवादीचे उमेदवार व एम.आय.एम.च्या उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज केली असता विजयाचे समिकरण बदलणारी आहे. गत निवडणूकीत भाजपचे १७ नगरसेवक निवडून आले होते. यावेळेस सहा सदस्य कमी विजयी झाले. उद्धवसेना १, काँग्रेस ३, वंचितच्या १ जागेची घट झाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे २ सदस्य वाढले असून शिंदेसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ व एम.आय.एम.चे ५ सदस्य निवडून आल्याने त्यांचे खाते उघडले आहे. पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी आकोट : आकोट नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एकाच प्रभागातून पती-पत्नी विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. १० मधून उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे व त्यांच्या पत्नी विजया बोचे निवडून आल्या आहेत. दिलीप बोचे प्रथमच विजयी झाले असून त्यांच्या पत्नी सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत.

AB7News

अकोट न.प. मध्ये भाजपच अव्वल !नगरसेवक पदाच्या ११ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष : काँग्रेसचा सहा जागांवर विजय

अकोट न.प. मध्ये भाजपच अव्वल !

नगरसेवक पदाच्या ११ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष : काँग्रेसचा सहा जागांवर विजय

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोट : नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या

निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या माया विवेक धुळे ह्या १५ हजार ९२८ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी एम.आय.एम.च्या सैय्यद फिरोजाबी शरीफ यांचा ५ हजार २७१ मतांनी पराभव केला. नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय व नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीमध्ये प्रारंभीपासून एम.आय.एम.ने आघाडी घेतली होती. प्रभागातील मतदानाची मतमोजणीच्या सुरुवातीलाच सलगपणे एम.आय.एम.ने सदस्य पदाच्या पाच जागांवर विजय मिळविला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराने घेतलेले मताधिक्य शेवटपर्यंत कायम ठेवत दुसरे स्थान मिळविले.

शहरातील मध्यभागी असलेल्या तर प्रभागापासून भाजपाच्या मताधिक्यामध्ये सतत वाढ होत गेली. एम.आय.एम.पक्ष मतांची आघाडी थांबली. काँग्रेस मात्र चांगलीच माघारली गेली होती. अखेर भाजपाच्या माया धुळे यांनी दणदणीत विजय मिळविला. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सैय्यद फिरोजाबी शरीफ (एम.आय.एम.) १०६७५, अलका संजय बोडखे (काँग्रेस) ८८५९, गाजीयाबानो मो. बद्रुजमा (रा.कॉ. अ. प. गट) ७६०९, स्वाती मंगेश चिखले (वंचित बहुजन आघाडी) ६३१४, विजया मनोहर चौधरी (उद्धत सेना) १७८१, चंचल सुनील पितांबरवाले (शिंदेसेना) १५७५, अर्शिया तब्बसुम वासीकअली (अपक्ष) ५८१ अशी मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारांनी बहुरंगी कल देत सर्वच पक्षांचे सदस्य निवडून दिले. निकाल घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष माया धुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी प्रमाणपत्र दिले.

‘राष्ट्रवादी’ व एम.आय.एम.च्या मतविभाजनाने भाजपाला संधी

विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क

आकोटः नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये कोण विजयी होणार याबाबत उत्सूकता लागली होती. नगर परिषदेत ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम.आय.एम.च्या मतविभाजनाने भाजपाला संधी मिळाली.

अकोट नगर परिषद

मतमोजणीच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होइल व कमी मताधिक्याने उमेदवाराचा विजय होइल, अशी अपेक्षा होती. मात्र एम.आय.एम.ने आघाडी घेत राष्ट्रीय पक्षांना मागे टाकले. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला एम.आय.एम.चे सलग ५ सदस्य विजयी झाले. त्यामुळे मतमोजणीस्थळी एम.आय.एम., भाजपा, काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल, असे दिसून येत होते. या निवडणूकीमध्ये उद्धवसेना, शिंदेसेना यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. काँग्रेसला मिळणारी परंपरागत मुस्लिम समाजाची मते यावेळी पाहिजे त्या प्रमाणात मिळू शकली नाहीत. परंतु निकालाची प्रत्येक फेरी घोषीत होत असताना सातत्याने एम.आय.एम. ला मतांची आघाडी मिळत होती.

प्रहारच्या दोन जागा वाढल्या

मुस्लिम मतांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम.आय.एम. मध्ये विभाजन झाल्याने भाजपाच्या मताधिक्यात वाढ होत गेली. राष्ट्रवादीचे उमेदवार व एम.आय.एम.च्या उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज केली असता विजयाचे समिकरण बदलणारी आहे. गत निवडणूकीत भाजपचे १७ नगरसेवक निवडून आले होते. यावेळेस सहा सदस्य कमी विजयी झाले. उद्धवसेना १, काँग्रेस ३, वंचितच्या १ जागेची घट झाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे २ सदस्य वाढले असून शिंदेसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ व एम.आय.एम.चे ५ सदस्य निवडून आल्याने त्यांचे खाते उघडले आहे.

पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी

आकोट : आकोट नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एकाच प्रभागातून पती-पत्नी विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. १० मधून उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे व त्यांच्या पत्नी विजया बोचे निवडून आल्या आहेत. दिलीप बोचे प्रथमच विजयी झाले असून त्यांच्या पत्नी सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत.

अकोट : नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्यानिवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या माया विवेक धुळे ह्या १५ हजार ९२८ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांनी एम.आय.एम.च्या सैय्यद फिरोजाबी शरीफ यांचा ५ हजार २७१ मतांनी पराभव केला. नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय व नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीमध्ये प्रारंभीपासून एम.आय.एम.ने आघाडी घेतली होती. प्रभागातील मतदानाची मतमोजणीच्या सुरुवातीलाच सलगपणे एम.आय.एम.ने सदस्य पदाच्या पाच जागांवर विजय मिळविला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराने घेतलेले मताधिक्य शेवटपर्यंत कायम ठेवत दुसरे स्थान मिळविले.शहरातील मध्यभागी असलेल्या तर प्रभागापासून भाजपाच्या मताधिक्यामध्ये सतत वाढ होत गेली. एम.आय.एम.पक्ष मतांची आघाडी थांबली. काँग्रेस मात्र चांगलीच माघारली गेली होती. अखेर भाजपाच्या माया धुळे यांनी दणदणीत विजय मिळविला. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सैय्यद फिरोजाबी शरीफ (एम.आय.एम.) १०६७५, अलका संजय बोडखे (काँग्रेस) ८८५९, गाजीयाबानो मो. बद्रुजमा (रा.कॉ. अ. प. गट) ७६०९, स्वाती मंगेश चिखले (वंचित बहुजन आघाडी) ६३१४, विजया मनोहर चौधरी (उद्धत सेना) १७८१, चंचल सुनील पितांबरवाले (शिंदेसेना) १५७५, अर्शिया तब्बसुम वासीकअली (अपक्ष) ५८१ अशी मते मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारांनी बहुरंगी कल देत सर्वच पक्षांचे सदस्य निवडून दिले. निकाल घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष माया धुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी प्रमाणपत्र दिले.राष्ट्रवादी’ व एम.आय.एम.च्या मतविभाजनाने भाजपाला संधीआकोटनगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये कोण विजयी होणार याबाबत उत्सूकता लागली होती. नगर परिषदेत ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम.आय.एम.च्या मतविभाजनाने भाजपाला संधी मिळाली.अकोट नगर परिषदमतमोजणीच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होइल व कमी मताधिक्याने उमेदवाराचा विजय होइल, अशी अपेक्षा होती. मात्र एम.आय.एम.ने आघाडी घेत राष्ट्रीय पक्षांना मागे टाकले. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला एम.आय.एम.चे सलग ५ सदस्य विजयी झाले. त्यामुळे मतमोजणीस्थळी एम.आय.एम., भाजपा, काँग्रेस अशी तिरंगी लढत होईल, असे दिसून येत होते. या निवडणूकीमध्ये उद्धवसेना, शिंदेसेना यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. काँग्रेसला मिळणारी परंपरागत मुस्लिम समाजाची मते यावेळी पाहिजे त्या प्रमाणात मिळू शकली नाहीत. परंतु निकालाची प्रत्येक फेरी घोषीत होत असताना सातत्याने एम.आय.एम. ला मतांची आघाडी मिळत होती.प्रहारच्या दोन जागा वाढल्यामुस्लिम मतांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम.आय.एम. मध्ये विभाजन झाल्याने भाजपाच्या मताधिक्यात वाढ होत गेली. राष्ट्रवादीचे उमेदवार व एम.आय.एम.च्या उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज केली असता विजयाचे समिकरण बदलणारी आहे. गत निवडणूकीत भाजपचे १७ नगरसेवक निवडून आले होते. यावेळेस सहा सदस्य कमी विजयी झाले. उद्धवसेना १, काँग्रेस ३, वंचितच्या १ जागेची घट झाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे २ सदस्य वाढले असून शिंदेसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ व एम.आय.एम.चे ५ सदस्य निवडून आल्याने त्यांचे खाते उघडले आहे.

पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी

आकोट : आकोट नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एकाच प्रभागातून पती-पत्नी विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. १० मधून उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे व त्यांच्या पत्नी विजया बोचे निवडून आल्या आहेत. दिलीप बोचे प्रथमच विजयी झाले असून त्यांच्या पत्नी सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.