ताज्या घडामोडी

पत्नीला जबर मारहाण करणाऱ्या पतीला १० वर्षाची शिक्षा

AB7News

पत्नीला जबर मारहाण करणाऱ्या पतीला १० वर्षाची शिक्षा

अकोट : दारूकरिता पैसे न दिल्याने पत्नीला खून करण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करणाऱ्या आरोपी नवऱ्याला १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी शुक्रवारी सुनावली.

अकोट शहर पोलिस स्टेशन येथे कलम ३०७, ३२६, ३२४, २०१, ५०६ भादंविचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी अंबादास पांडुरंग मोरे याला अकोट न्यायालयाने ३०७, २०१ भादंवि कलमामध्ये दोषी ठरविले. कलम ३०७ नुसार १० वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रूपये द्रव्यदंड, दंड न भरल्यास ६ महिने अधिकचा कारावास व २०१ भादंविमध्ये १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रूपये द्रव्यदंड, द्रव्यदंड न भरल्यास ३ महिन्याचा कारावास अशाप्रकारची शिक्षा सुनावली.

अकोट जिल्हा सत्र न्यायालयाचा निकालदोन्ही शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत. हकीकत अशी की, यातील फिर्यादी अरूणा अंबादास मोरे रा. संकल्प कॉलनी अकोट यांनी अकोट शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, १ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी व तिचा पती घरात होते. मुलगा नंदकिशोर नेटकॅफेवर गेला होता तर मुलगी अभ्यासाकरिता वाचनालयात गेलेली होती. फिर्यादीच्या पतीने दारू पिण्यासाठी ३०० रूपये मागितले. मात्र पैसे न दिल्याने आरोपीने फिर्यादी महिलेच्या कपाळावर जोरात वरवंटा मारला. यामध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी झाली.

तिच्यावर अकोला येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी अकोट पोलिसात पती विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने दखल घेऊन आरोपी अंबादास मोरे विरूध्द दोषारोपण करून खटला चालविला. आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या.

सरकार पक्ष व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पी.बी. सहारे यांनी बाजू मांडली. सहा. सरकारी अभियोक्ता अजित देशमुख यांनी प्रकरणात सहकार्य केले. या प्रकरणाचा तपास पोउनि रत्नदीप पळसपगार यांनी केला. स.पो.नि. प्रकाश जोशी यांनी पैरवी म्हणून सहकार्य केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.