ताज्या घडामोडी

राज ठाकरे कडून युतीला घेऊन दोन्ही पक्षाच्या नेत्यांना महत्वपूर्ण सूचना

AB7News

राज ठाकरे कडून युतीला घेऊन दोन्ही पक्षाच्या नेत्यांना महत्वपूर्ण सूचना

मुंबई:- दोन्ही  ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेना उबाठा गटात युती होणार आणि दोन्ही ठाकरे बंधू मुंबई बीएमसी सह राज्यात इतर काही ठिकाणच्या निवडणुका एकत्र लढणार अशी चर्चा होती. आता मनसे आणि उबाठा गट एकत्र निवडणूक लढणार आहेत. ही युती नाही तर प्रीती संगम आहे असे वक्तव्य खा.संजय राऊत यांनी केले आहे.मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंची जवळीक वाढली असून युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. काही जागांवरुन दोन्ही सेनांमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच आता जागावाटपावर थेट राज ठाकरेंनीच एक महत्त्वाची सूचना केल्याची माहिती समोर येत आहे.

ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनच्या युतीबाबत पुन्हा एका दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा झाली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. जवळपास 40 ते 45 मिनिटे दोन्ही पक्षाच्या नेत्यांदरम्यान चर्चा झाली. शिवसेना आणि मनसे युतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती राऊत यांनी या भेटीनंतर दिली. जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज पुन्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. दरम्यान, रविवारी एकीकडे राज्यभरातील नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच मुंबईत राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकरांसोबतही राऊत आणि राज यांनी चर्चा केली. या भेटीदरम्यान युतीसंदर्भात पुढील पक्ष धोरण कसं असेल याबद्दल सकारात्मक चर्चा झाली.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.