ताज्या घडामोडी

पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटकअधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई 

AB7News

पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटकअधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई

मुंबई : एका खासगी कंपनीच्या लेखापरीक्षणादरम्यान कंपनीला ९८ लाखांचा कर लावण्याची धमकी देत ते प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (सीजीएसटी) अधीक्षकाला सीबीआयने मुंबईत अटक केली. अंकित अगरवाल असे त्याचे नाव आहे.संबंधित कंपनीच्या संचालकांनी अधिकाऱ्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयने सापळा रचून अगरवालला लाचेचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना अटक केली.घरात १८ लाखांची रोकडअटक केल्यानंतर सीबीआयने या अधीक्षकाच्या निवासस्थानी छापेमारी केली. असता त्याच्याकडे १८ लाख ३० हजारांची रोकड, ४० लाख रुपयांच्या आणि ३२ लाख रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्रेही आढळली.सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीचे लेखा परीक्षण करताना अगरवालने कंपनीच्या संचालकाला आपण कंपनीला ९८ लाख रुपयांच्या कराची नोटीस जारी करत असल्याचे सांगितले.तसेच, हे प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, तडजोडीअंती लाचेची रक्कम १७ लाख रुपये निश्चित करण्यात

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.